सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.
कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.
गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे..! pic.twitter.com/KAE86pvl1J
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 6, 2023
Vision Abroad