Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी कडवाई – रत्नागिरी या मार्गावर सकाळी ०७:४० ते १०:४० या वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
१) Train no. 19577 Tirunelveli Jn. – Jamnagar Express
दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी ठोकूर ते रत्नागिरी या दरम्यान ३ तास उशिराने धावणार आहे.
२) Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी ठोकूर ते रत्नागिरी या दरम्यान १ तास ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक १० ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी खेड ते चिपळूण दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मडगाव – कुमता या मार्गावर सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
1) Train no.06602 Mangaluru Central – Madgaon Jn. Special
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कुमता ते मडगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2) Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central – Special
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कुमता दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad