मुंबई :एसटीची शयनयान Sleeper बस सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या सेवेची सुरवात झाली असून पहिली बस सेवा मुंबई ते बांदा अशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे आणि ईतर खाजगी बस प्रमाणे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी ही सेवा निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मात्र या सेवेचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
याचे कारण असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC या बस साठी ईतर बस प्रमाणे देण्यात येणार्या सवलती या बस दिल्या आहेत. त्यात महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्थानका दरम्यान च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये एवढे आरक्षण शुल्क भरून प्रवास करता येणार आहे.
आरोग्याच्या समस्या असल्याने दहा ते बारा तास बसुन प्रवास करणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक आणि गैरसोयीचे होते. सध्या रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकिट दरांमध्ये असलेल्या सवलती कोरोना काळापासून बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि मोफत असलेला पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नक्किच होईल.
Facebook Comments Box
Vision Abroad