Konkan Railway News: दिवाळी सणासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे दिवाळी सणासाठी मुंबई-मंगलुरु जंक्शन दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे
01185/01186 एलटीटी मुंबई – मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई साप्ताहिक विशेष (14 सेवा)
01185 एलटीटी मुंबई – मंगलुरु जंक्शन विशेष ही गाडी दिनांक 20.10.2023 ते 01.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शुक्रवारी 22.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी 17.05 संध्याकाळी मंगलुरु जंक्शन या स्थानकावर पोहचणार आहे.
01186 मंगलुरु जंक्शन – एलटीटी मुंबई विशेष ही गाडी दिनांक ,21.10.2023 से 02.12.2023 पर्यंत (एकूण 7 फेऱ्या) प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 18.45 वाजता मंगलुरु जंक्शन या स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहचणार आहे.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड़, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाड़ी रोड, थिविम, करमाली, मडगांव, करवार, गोकर्ण रोड, कुमता, मुरुदेश्वर, भटकल, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंडापुरा , उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकुर
डब्यांची संरचना:
01 वातानुकूलित -2 टियर, 05 वातानुकूलित -3 टियर, 08 शयनयान श्रेणी , 07 जनरल आणि ०२ एसएलआर – (एकूण = 21 आईसीएफ कोच)
या गाड्यांचे आरक्षण सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर पासून चालू होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad