राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे, रत्नागिरी
राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा
Facebook Comments Box


