मुंबई : अलीकडेच सुरु झालेल्या मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या वेग १ नोव्हेंबर २०२३ पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत दहा तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा वेळ दोन तासांनी वाचणार आहे.
त्याच बरोबर या गाड्याच्या फेऱ्याही पूर्ववत करण्यात येणार आहेत. दिनांक ०१ नोव्हेंबर पासून ही गाडी शुक्रवार वगळता दररोज चालविण्यात येणार आहे.
पावसाळयात अपघात टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालविल्या जातात. या वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा वेगही कमी करण्यात आला होता. तसेच फेऱ्याही कमी करून ही गाडी आठवड्यातून फक्त ३ दिवस चालविण्यात येत होती.
सध्या मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघते आणि मडगावला दुपारी ३. ३० वाजता पोहोचते. साधरणात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाच्या वेळ १० तास लागत आहे.
मात्र, १ नोव्हेंबर २०२३ पासून नॉन मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी १ वाजून १० मिनिटात पोहचणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाच्या वेळ साधारणता दोन तास वाचणार आहे.
असे असणार नॉन मान्सून वेळापत्रक-
२२२२९/२२२३०मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता.
२२२२९ सीएसएमटी मुंबईहून ०५.२५वाजता निघेल आणि मडगावला दुपारी १.१० वाजता पोहोचेल.
२२२३० मडगावहून दुपारी २.४० वाजता निघेल आणि रात्री १०. २५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
MAO VANDE BHARAT TIMETABLE (From 1st Nov) | ||
Station Name | Down 22229 |
Up 22230 |
C SHIVAJI MAH T | 05:25 | 22:25 |
DADAR | 05:32 | 22:05 |
THANE | 05:52 | 21:35 |
PANVEL | 06:30 | 21:00 |
KHED | 08:24 | 19:08 |
RATNAGIRI | 09:45 | 17:45 |
KANKAVALI | 11:10 | 16:18 |
THIVIM | 12:16 | 15:20 |
MADGAON | 13:10 | 14:40 |
Facebook Comments Box
Vision Abroad