Vande Bharat Express : वेगवान आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या 34 वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता वंदे भारतची स्लीपर कोच येत आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरुन धावणार आहे.
प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काही मार्गांवर विमान कंपन्यांनी भाडे कमी केले आहे. देशभरात लोकप्रिय झालेल्या या ट्रेनमध्ये स्लीपर कोच सुरु होणार आहे. ही ट्रेन पुणे ते बेंगळुरु दरम्यान असणार आहे. मार्च 2024 पर्यंत स्लीपर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे.
स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहेत. त्यात दोन कोच विमानच्या धर्तीवर असणार आहे. त्या कोचमधून किती वजन घेऊन जात येईल, हे निश्चित असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये 11 एसी टियर असून त्यात 611 सीटे असणार आहेत. 4 एसी टियर-2 मध्ये 188 बर्थ असतील. एक फर्स्ट एसी असणार असून त्यात 24 बर्थ असणार आहेत. एकूण 823 सीट या ट्रेनमध्ये असणार आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad