राजापूर: फावल्या वेळात गरवून मासे पकडणे हा बऱ्याच जणांचा आवडता छंद. तीन ते चार तास गरवून फक्त कालवणापुरते मासे भेटले तरी पुरे असे म्हणून वेळ घालवणारे पण तुम्ही पहिले असतील. पण एक कल्पना करा गरवताना एक दोन किलो नाही तर चक्क २० किलोचा मासा गळाला लागला तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हो असे झाले आहे.. बाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला समुद्रकिनारी गरवताना काल चक्क 20 किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला आहे. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे. म्हणजे त्याला एकूण या माशापासून 3600 रुपये इतका फायदा झाला आहे.
मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करणारा राहुल फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. त्याच्यासारखे बरेच तरुण युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात.
Facebook Comments Box
Vision Abroad