मुंबई : आठवड्याभराच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात व्यापार सत्राचा शेवट गोड झाला आहे. गुरुवारी मार्केटमधील मोठी पडझडीनंतर शुक्रवारी देशांतर्गत बाजारात हिरवळ परतली आणि सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, त्यामुळे गुंतवणूकदारांनी अनेक दिवसांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्राचा शेवट सकारात्मक केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा NSE निफ्टी १९० अंक किंवा १.०१% वाढीसह १९,०४७.२५ अंकांवर स्थिरावला, तर मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ६३४.६५ अंक किंवा १.०१% उसळी घेत ६३,७८२.८० अंकांवर बंद झाला.
स्मॉलकॅप शेअर्सनी वाढीव आघाडी घेतली. तर बँक निफ्टी निर्देशांक ५०१.८५ अंकांनी म्हणजे १.१९ टक्क्यांनी ४२,७८२ अंकावर चढला. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांनी मागील दिवसातील मोठ्या घसरणीनंतर जोरदार खरेदी केली.
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
आज बाजारात सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. निफ्टी बँक ५०१ अंकांच्या किंवा १.१९ टक्क्यांच्या वाढीसह ४२,७८२ अंकांवर बंद झाला. तर एफएमसीजी समभागातील खरेदीमुळे निफ्टी आयटी १.२४%, निफ्टी ऑटो १.३५%, निफ्टी एफएमसीजी ०.८९% वाढीसह बंद झाला.
आजचे टॉप गेनर्स
टाटा स्टील, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, SBI, सन फार्मा आणि एनटीपीसी सेन्सेक्समध्ये हिरवळ राहिली, तर हिंदाल्को आणि बजाज ऑटो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तसेच रिलायन्सने आज दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या जोरावर १ टक्के वाढ नोंदवली. सकाळच्या सत्रात केवळ एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचयूएलचे शेअर्स तोट्याने उघडले.
सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली असून मेटल, रियल्टी, मीडिया आणि ऑटो शेअर्स १% हून अधिक वाढले, तर बँक निर्देशांक ०.६% आणि आयटी निर्देशांक ०.८% चढले. तसेच इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल्स, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एसबीआयचे शेअर्स सध्या निफ्टीवर सर्वाधिक वाढले आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad