मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.
दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.
प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे.
Vision Abroad