सावंतवाडी :सावंतवाडी रेल्वे स्थानकावर बऱ्याच सुविधेंचा अभाव आहे. येथून मिळणारे उत्त्पन्न तुलना केल्यास चांगले असूनही खूप कमी गाडयांना येथे थांबे आहेत. टर्मिनस चे काम अपुरे आहेत. असे अनेक प्रश्न असल्याने सावंतवाडीकर कधी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, तर कधी राजकीय पुढाऱ्यांना निवेदने देत आहेत. तरीही सर्वच प्रश्नच तसेच आहे. उलट सावंतवाडीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार कोकण रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहेत. निवेदने स्वीकारताना दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता सावंतवाडीकरांना कोकण रेल्वे प्रशासनाने ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या म्हणीप्रमाणे म्हणण्याची वेळ आणून ठेवली आहे.
काल कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता सावंतवाडी स्थानकाच्या भेटीला आले असता आपल्या ग्रुप तर्फे मिहिर मठकर, विनायक गवस आणि भूषण बांदिवडेकर यांनी सावंतवाडी स्थानकातील गैरसोयी बद्दल निवेदन दिले परंतु श्री गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली. ते या वरही ना थांबता स्वर्गीय डी के सावंत यांच्याबद्दल टिपण्णी केली असल्याचा आरोप मिहिर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. यावेळचा विडिओ देखील त्यांनी बनवला असून त्यात श्री संजय गुप्ता हे या मागण्यांची चेष्ठा करताना दिसत आहेत.
मागे ऑगस्ट महिन्यात मीहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली होती. त्यावेळी सावंतवाडी स्थानकावरील राजधानी एक्सप्रेस या गाडीचा थांबा पूर्ववत करावा तसेच वंदे भारत तसेच अन्य गाडयांना या स्थानकावर थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावेळी वी.स. सिन्हा यांनी राजधानी सारख्या गाड्यां मधून प्रवास करण्याची सावंतवाडीकरांची कुवत नाही असे अपमानास्पद विधान केले होते.
"भीक नको, पण….." सावंतवाडीकरांच्या मागण्यांची कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून चेष्टा – Kokanai https://t.co/XtDy6qZCtD#konkanrailway #KonkanNews pic.twitter.com/wuKMaqb24N
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) November 18, 2023