Konkan Railway News: फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा अस आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.
गाडी क्रमांक ०६२०५ वास्को – दर्शन नगर- वास्को द गामा स्पेशल एक्सप्रेस
ही गाडी दिनांक १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी (सोमवारी) चालविण्यात येणार आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी वास्को स्थानकावरून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता अयोध्येला पोहोचणार आहे.
परतीचा प्रवासात म्हणजे दुसऱ्या दिवशी ही गाडी दिनांक १६ फेब्रुवारी आणि ०१ मार्च (शुक्रवारी) रोजी रात्री ८ वाजता ही गाडी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता वास्को या स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीचे कोकणात मडगाव , थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि वसई या स्थानकावर थांबे आहेत.
ही गाडी २० सेकंड स्लीपर आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २२ कोचसहित चालविण्यात येणार आहे.

Facebook Comments Box