Konkan Railway News:आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वेने या जत्रेसाठी एक विशेष गाडी ट्रेन व डिमांड (TOD ) तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सरीवस्तार माहिती खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01043/01044 एलटीटी – करमाळी- एलटीटी विशेष (TOD)
ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक शुक्रवारी दिनांक ०१ मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार दिनांक ३ मार्च रोजी करमाळी या स्थानकावरून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम स्थानकांवर थांबेल .
रचना : एकूण 22 एलएचबी कोच : टू टायर एसी – 02 कोच + थ्री टायर एसी – 06 कोच + स्लीपर – 08 कोच, जनरल – 03 कोच, एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन – 01
आरक्षण
सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी या दिवशी या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भाविकांसाठी खुशखबर! आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाडीची घोषणा – Kokanai
सविस्तर वृत्त👇🏻 https://t.co/BL8jbsHFwR#konkanrailway #आंगणेवाडीजत्रा #specialtrains pic.twitter.com/nWajfp9Mu1
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) February 22, 2024
Facebook Comments Box
Vision Abroad