कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे एकूण २२ मागण्यांचे निवेदन रेल्वेकडे सुपूर्त; कोणत्या आहेत या मागण्या? इथे वाचा…

मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने

१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.

२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.

३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.

४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.

५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.

६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.

७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.

८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.

९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.

१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.

११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.

१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.

१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.

१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.

१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.

१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.

१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.

१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.

१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.

२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.

२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.

२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.

अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

2 thoughts on “कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे एकूण २२ मागण्यांचे निवेदन रेल्वेकडे सुपूर्त; कोणत्या आहेत या मागण्या? इथे वाचा…

  1. Sujay pandurang Sawant says:

    ऊनहलाच्या हंगामात् जन शताब्दि सारखी रात्री ८.०० वाजत्या दरम्यान सीटिंग गाडी दादर हुन सावंतवाडी सोडली तर सर्व प्रवाशान्या जास्त लाभ होईल. तसेच सकाली सुद्धा गणपति मधे सोडली तशी मुंबई सावंतवाडी सोडली तर इतर गाड़ी वरील भार कमी होईल.

  2. Pramod says:

    कोकण विाभागातील जिल्ह्यासाठी दोन नवीन सुपरफास्ट गाड्या सोडण्यात याव्यात व प्रवासाच वेळ कमी करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search