Kashedi Tunnel :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.
एकेरी वाहतुक चालू केली असली तरीही हा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरोधी बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने सुद्धा काही वाहनचालक वाहने चालवताना दिसत आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad