मुंबई दि. १ मार्च २०२४: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार या महामार्गास राज्य महामार्ग (विशेष )क्रमांक १० म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.
आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घाराप, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा
‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.
११ हजार हेक्टर जागेची गरज
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.
अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
![]()
Facebook Comments Box
Related posts:
SSC Result 2025: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल?
महाराष्ट्र
Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? इथे वाचा
लोकसभा निवडणूक २०२४
गणेशभक्तांना खुशखबर: तब्बल १५ स्लीपर असलेल्या विशेष गाडीला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
कोकण रेल्वे



Nice
Marathvada development project