Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीचा यावर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या मार्च अखेरपर्यंत संपविण्यात येणार होती पण आता तिची सेवा ०७/०६/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या महिन्यात संपविण्यात येणार होती पण आता तिची सेवा दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
कल्याण येथे थांबा देण्याच्या मागणीला केराची टोपली
गाडी क्रमांक ०२१९७/०२१९८ जबलपूर कोईमतूर या विशेष गाडीचा वारंवार विस्तार होत आहे. या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले होते. तसेच इतरही संघटनांनी ही मागणी केली होती. मात्र या मागणीकडे रेल्वेप्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे.
कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी स्थित आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे किंवा दादर या ठिकाणी जावे लागते. जबलपूर कोईमतूर ही गाडी कल्याण स्थानकावरून जाते; मात्र या स्थानकावर या गाडीला थांबा का नाही दिला जात आहे हा पण एक मोठा प्रश्नच पडत आहे. या गाडीला कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकावर थांबा आहे. या गाडीला कल्याण स्थानकावर कायम स्वरूपी थांबा मिळाल्यास येथील कोकणवासीयांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार होता.
Facebook Comments Box
Vision Abroad