महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले जात असल्याचा वनशक्ती संस्थेचा आरोप.
सावंतवाडी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या महामार्गामुळे येथील अल्पभूधारक भमिहीन होतील तसेच महामार्ग झाल्यास पुराचा धोका वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तेथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता तर कोकणातही या महामार्गास विरोध होण्यास सुरवात झाली आहे.
या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग कोकणावर लादला जात आहे. हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातील निसर्गाला मोठी हानी पोचणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत असे येथील वनशक्ती संस्थेने जाहीर केले आहे
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले गेले आहे. त्यामुळे कोकणाला गुलामगिरीमध्ये आणायचं का? हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Facebook Comments Box




Indian must explore diversified culture of India in America