दापोली, दि. २९: कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली आहे. गेल्याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांनी गैरव्यवहारातून केलेल्या जमीन खरेदीविरोधात आवाज उठवला होता. अशीच सुरवात आता रत्नागिरी तालुक्यातील दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे.
ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत.त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे.ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो.अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात.अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
फक्त १९९१ रुपयामंध्ये विमान प्रवास! फ्लाय-९१ कंपनीची गोवा, हैद्राबाद, बेंगळुरु आणि सिंधुदुर्ग प्रवास...
कोकण
Konkan Railway: वांद्रे - मडगाव एक्सप्रेसचा मुहुर्त ठरला; या दिवशी दाखवला जाणार हिरवा कंदील
कोकण
सावंतवाडीतील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा 'राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५' ने गौरव
कोकण


