मुंबई : कोकण रेल्वेचे KRCL व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे या पदावरूंन निवृत्त झाल्याने त्या जागी आता संतोष कुमार झा हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
संतोष कुमार झा यांनी लखनौ विद्यापीठातून (भूविज्ञान) एम.एससी. आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून एमबीए (मार्केटिंग) केले आहे. ऑपरेशन्स, पायाभूत सुविधा नियोजन आणि व्यवसाय विकास क्षेत्रात २८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले झा यांनी भारतीय रेल्वेच्या प्रमुख विभागांचे संचालन केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात तसेच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात ४९० कोटी खर्च करूनही महामार्गाचे काम अपूर...
कोकण
पुण्याहून सिंधुदुर्गासाठी निघालेले विमान चीपी विमानतळावर न उतरता गोव्याला उतरले; कारण काय?
कोकण
रेल रोको च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची पालकमंत्री श्री नितेश राणे आणि आ...
कोकण