शक्तीपीठ महामार्ग | विघ्ने वाढलीत; महामार्गाच्या विरोधात १ हजार ३११ हरकती दाखल

सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्‍यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्‍यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्‍यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत

प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search