IMD Alert: भारतीय हवामान खात्याने IMD राज्यात पुढील चार/ पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खास करून दिनांक १२ आणि १३ मे या दोन दिवशी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १२ मे रोजी नाशिक,अहमदनगर,पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो र्ट देण्यात आला आहे.
दिनांक १३ मे रोजी अहमदनगर,पुणे, औरंगाबाद, जालना,यवतमाळ, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट नसला तरी बहुतेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Facebook Comments Box