Konkan Railway News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चे काम सुरू असल्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सेवा दादर आणि पनवेल पर्यंत काही कालावधीसाठी मर्यादित केली आहे, त्यामध्ये आता ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीचीही भर पडली आहे.
कोकण रेल्वेने आज दिनांक २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार दिनांक २८ मे ते ०२ जून पर्यंत ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित Terminate करण्यात येणार आहे.
ऐन हंगामात प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची सेवा पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित केली असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहे. मात्र तिचे वेळापत्रक पाळले जात नसून तिला पनवेल पर्यंत पोहोचायला उशीर होत आहे. अनेकदा त्या वेळेपर्यंत पनवेल ते ठाणे या लोकल मार्गावरील लोकल सेवा रात्री बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासात वरिष्ठ नागरिक, लहान मुलांना सांभाळत घरी पोहोचणे जिकरीचे झाले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad