भलताच सातबारा दाखवून भूमिअभिलेख अधिकार्यांना हाताशी धरून जमीन प्रयत्न. स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा.
आंबोली, दि-३०:– महिन्याभरापूर्वी येथील जमीन बेकायदा हडपून त्यावर बांधकाम केल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. तसाच प्रकार आंबोलीत दुसऱ्या भूखंडात घडत आहे. सर्वे क्रमांक ८४ड मध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असून, भलताच सातबारा दाखवून आपली नावे असल्याचे सांगत भूमिअभिलेख ला हाताशी धरत मोजणी करत आहे,याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
23 नंबर सर्वे मध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्याला एक महिना ही पूर्ण न होता परत तोच प्रकार आंबोलीत चालू आहे आंबोली मधील सर्वे नंबर 84 ड महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये परप्रांतीयांनी सर्वे करून जमीन हडपण्याचा प्रकार चालू केला आहे. आंबोलीतील जमिनी महाराष्ट्र शासनच्या नावावर करून सरकारचा धन दांडगे आणि भूमापिया यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र शासन या नावाने सातबारा असूनही भूमी अभिलेख अधिकारी पोलीस प्रोटेक्शन सह महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा सर्वे करत आहेत आणि भूमाफियांना जमीन वाटप करत आहेत .महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परप्रांतीयांचा परस्पर सर्वे करून भूमी अभिलेख काय सिद्ध करत आहे असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे आंबोलीतील भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत परप्रांतीयांनी अतिक्रमण केले तर पुन्हा एकदा त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.