सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही. नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad