Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपाचा बदल

   Follow us on        
Konkan Railway Notification:कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात काहीसा बदल करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12284 / 12283 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (साप्ताहिक) आणि गाडी क्रमांक 12450 / 12449 चंदीगड – मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या एका जनरेटर कोचच्या जागी एक सेकंड स्लीपर चा डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
गाडी क्रमांक 12284  हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. या गाडीत दिनांक 29/06/2024 ते 28/09/2024  पर्यंत तर गाडी क्र. 12283  एर्नाकुलम जं. -हजरत निजामुद्दीन या गाडीत दिनांक 02/07/2024 ते 01/10/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.
गाडी क्र. 12450 चंदीगड – मडगाव जं.  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक17/06/2024 ते 16/09/2024 पर्यंत तर गाडी क्र. 12449  मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक 19/06/2024 ते 18/09/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search