बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका
Follow us onमुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.
२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.
६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.
१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.
या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.
Vision Abroad