चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.