मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक आयोजित ७८ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम बाळ-गोपाळ, भगिनी व रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन जल्लोषात व उत्साहात पार पाडला. ध्वजारोहण सुधाकर कदम, विषश कार्यकारी अधिकारी व संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगीत गाण्यात आले.
उत्सव मंडळाच्या वतीने वर्षभरात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सल्लागार डॉ. मकरंद गावडे, राजेश सोनवणे, अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे, व्यवस्थापक प्रशांत प्रिदांवनकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले तर सुधाकर वस्त यांनी समस्त रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार व्यक्त केले.
Facebook Comments Box