मुंबई: बोरिवली येथून कोकणात जाण्यासाठी एक नियमित रेल्वे गाडी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या कोकणकरांसाठी एक आशा निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने बोरिवली ते सावंतवाडी अशी गाडी येत्या २४ ऑगस्ट रोजी चालू होणार असल्याची माहिती उत्तर मुंबईच्या कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुमेश आंब्रे यांनी दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बोरिवली तुन कोकणात जाणारी नियमित रेल्वे चालू करणार अशी ग्वाही दिली होती. त्यांनी आपला शब्द खरा केला असून ही गाडी सोडण्यासाठी सर्व तजवीज केली आहे. या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती दिनांक २३ ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बोरिवली-दहिसर, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकर जनतेची वस्ती आहे. कोकणात जाण्यास गाडी पकडण्यासाठी त्यांना दादर किंवा वसई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बोरिवली येथून कोकणसाठी नियमित स्वरूपात गाडी चालविण्यात यावी यासाठी खूप वर्षांपासून मागणी होत आहे. खासदार पियुष गोयल यांनी बोरिवली येथून कोकणसाठी गाडी चालविण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मुंबई:
Facebook Comments Box
Vision Abroad