Revas Reddy Coastal Highway: रेवस रेड्डी सागरी महामार्गाविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या सागरी महामार्गावरील 1.7 किमीच्या बाणकोट खाडी वरील EPC मोडवर असलेल्या पुलाच्या नागरी बांधकामासाठी NCC Ltd या कंपनीला सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सावित्री नदीवरील हा नवीन पूल रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट (वेसवी बंदराजवळ) आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला (हरिहरेश्वरजवळ) जोडणार आहे. रेवस – रेड्डी कोस्टल महामार्गावरील बाणकोट पूल हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या ८ नवीन पुलांच्या मालिकेचा एक भाग आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने मार्च 2024 मध्ये या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित रु. 272.88 कोटी आणि बांधकाम कालावधी अवधी ३ वर्षे साठी निविदा मागवल्या होत्या. एकूण 4 बोलीदारांच्या बोली दिनांक 2 जुलै रोजी तांत्रिक बोली आल्या होत्या. या बोलींत सर्वात कमी बोली रुपये NCC Ltd ची रुपये 355.99 या रकमेची होती. तर टी आणि टी इन्फ्रा (359.92 कोटी रुपये), अशोका बिल्डकॉन (363.47 कोटी रुपये), रेल विकास निगम लिमिटेड RVNL (380.70 कोटी रुपये) या बोलीदारांनी बोली लावली होती.
एनसीसीची 355.99 कोटी रु.ची बोली MSRDC च्या 272.88 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा 30.45% जास्त होते त्यामुळे त्यामुळे MSRDC आणि बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन या पुलाचे कंत्राट अंतिम करण्याबाबत बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे.
Facebook Comments Box