रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या अवकाळी पावसाने आणि पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही झोडपले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसामुळे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील कोटयावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र आज झालेल्या घटनेमुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुशोभणीकरणाचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला असून यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे. मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. आजच्या पावसात या स्थानकावरील छताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्या.
रत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Video: रत्नागिरी रेल्वे स्थानकात पावसामुळे पीव्हीसी शीट निघून लोंबकळण्याचा प्रकार; कोकण रेल्वे स्थानकांवरील सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह – Kokanai https://t.co/jq2Ql3WB84#konkanrailway #KonkanNews #konkanrailway #pwd pic.twitter.com/J4s1EHNxlv
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) October 6, 2024
Vision Abroad