Konkan Railway: मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रेल्वे रूळावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाणार असून या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे सेवेवर होणार आहे,तो खालील प्रमाणे
या गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:
गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १२/१०/२०२४ आणि १३/१०/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास दादर येथे समाप्त होईल.
दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २०११२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकणकन्या” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल येथे समाप्त होईल.
दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “तेजस” एक्सप्रेसचा प्रवास दादर येथे समाप्त होईल.
या गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन :
गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास दादर येथून सुरू होणार आहे.
गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास पनवेल स्थानकावरून सुरू करण्यात आहे.
Vision Abroad