यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला आहे. एकूण १३२ जागा जिंकून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर त्यानंतर जागा जिंकण्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी बाजी मारली आहे.
मात्र पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे आहे.
पक्षनिहाय मतदान टक्केवारीतही भाजप राज्याच्या मतांच्या २६.७७% मते घेऊन क्रमांक १ वर आहे. तर १२.४२% टक्क्यानिशी दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. शिवसेना शिंदे गट एकूण मतांच्या १२.३८% मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण मतांच्या १.५५% वाटा भेटला असला तरी तिला त्याचे रूपांतर एकाही विजयी जागेत करता आले नाही.
पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी
क्र. | पक्ष | टक्केवारी |
1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | 26.77% |
2 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | 12.42% |
3 | शिवसेना | 12.38% |
4 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | 11.28% |
5 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | 9.96% |
6 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | 9.01% |
7 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | 1.55% |
8 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | 0.85% |
9 | नोटा | 0.72% |
10 | बहुजन समाज पार्टी | 0.48% |
11 | समाजवादी पक्ष – सपा | 0.38% |
12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | 0.34% |
13 | इतर | 13.86% |
Facebook Comments Box
Vision Abroad