मुंबई: शिवशाही बसच्या वाढत्या अपघात घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच वाढलेल्या शिवशाही बसच्या अपघातांमुळे शवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, शिवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना एसटी महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. एसटी महामंडळाने या चर्चांना मूळ नसल्याचं सांगत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, शिवशाही बस सेवा प्रवाशांच्या सोईसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवशाही बस या राज्यभर प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, ती वेळेवर सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते.
महामंडळाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. अपघातांमुळे आलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाही महामंडळाने बस सेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असून, वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या अधिकृत ‘एक्स’ माध्यमातून महामंडळाने या बद्दल खुलासा केला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही. असे या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
खुलासा..
एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.(जनसंपर्क अधिकारी) pic.twitter.com/CyrIINKV0Q
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) December 2, 2024
Vision Abroad