Konkan Railway:सावंतवाडी पंचक्रोशी प्रवाशांना रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणाऱ्या नागपूर -मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देताना सावंतवाडी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीची मुदत या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणार होती. मात्र तिला आता पुढील सूचना येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव या गाडीला दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून तर गाडी क्रमांक ०११४० मडगाव नागपूर या गाडीला दिनांक ०२ जानेवारी २०२५ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे थांबा मंजूर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश.
सुरवातीला या गाडीला सावंतवाडी सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला होता. मात्र चांगल्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही या गाडीचा सावंतवाडी येथील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळेपासून हा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने अनेकदा निवेदने दिली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी रेल्वे प्रशासनाचे, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत
या गाडीचे सावंतवाडी स्थानकावरील वेळापत्रक
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.
Facebook Comments Box
Vision Abroad