रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबिर
नवीन वर्ष सुरू होतंय..प्रत्येकजण मनाशी एक नवीन निश्चय करत असतो. तर मग विचार कसला करताय रत्नागिरीकरांनो ..कारण नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची एक नामी संधी उपलब्ध होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात संपन्न होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक नागरिकांनी दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9
क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा
Facebook Comments Box
Vision Abroad