HSC exam hall tickets: बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.
यासोबतच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in ‘ या संकेतस्थळावरून आज पासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन हॉल तिकिटे मिळविण्यास काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत अशी माहिती सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
Vision Abroad