Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.
“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
Follow us on
The viral video circulating on social media is misleading.
No such incident of trains nearly meeting head-on on the same track at Mira Road Station has occurred..
At 17.00 hrs today , a local train was held up behind another on the same track, maintaining an adequate and safe…
— Western Railway (@WesternRly) January 15, 2025
Vision Abroad