Sawantwadi: आंदोलनकर्त्यांना रेल रोको आंदोलनापासून परावृत्त करावे; प्रांताधिकाऱ्यांचे कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र

सावंतवाडी: सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, येथे महत्वाच्या गाडयांना थांबे देण्यात  यावेत तसेच इतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने येत्या  २६ जानेवारी रोजी ‘रेल रोको’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना आणि सूचना संबंधित कार्यलये आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेली आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर सावंतवाडी विभाग प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्रव्यवहार करत आंदोलनकर्ते यांना या आंदोलनापासून परावृत्त
करण्यात यावे, असे सांगितले आहे.
प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळ व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचा आंदोलन अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर अर्जात सावंतवाडी रोड स्थानकावरील टर्मिनसचे भूमिपूजन झालेले असून रखडलेले रेल्वे टर्मिनमचे काम जलद गतीने करण्यात यावे. सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करण्यास पुन्हा एकदा आवश्यक पाठपुरावा करणे, सावंतवाडी स्थानकचे नामकरण प्रा. मधु दंडवते असे करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा. कोरोना काळात ZBTT नुसार काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे. तसेच सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशा विविध मागण्याबाबत दि. २६ जानेवारी रोजी सावंतवाडी स्थानकात आंदोलन करणार या कार्यालयास कळविलेले आहे. सदरचा अर्ज पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठविणेत आपलेकडे आहे. येत सदर अर्जाच्या अनुषंगाने आपले स्तरावरुन नियमाधीन कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत आंदोलनकर्ते यांना कळवून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे असे प्रांताधिकारी यांनी म्हटले आहे.
Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search