Jalgaon Railway Accident : नुसत्या एका आगीच्या अफवेने सात ते आठ प्रवाशांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज जळगावला घडला. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला.
मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.
Vision Abroad