आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 21:28:52 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 18:41:02 पर्यंत
- करण-तैतुल – 10:10:29 पर्यंत, गर – 21:28:52 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-इंद्रा – 16:16:27 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:13
- सूर्यास्त- 18:33
- चन्द्र-राशि-वृषभ – 30:22:20 पर्यंत
- चंद्रोदय- 13:37:00
- चंद्रास्त- 27:33:59
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- वन अग्नि सुरक्षा दिवस.
- ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन
- व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात. (रोस डे)
महत्त्वाच्या घटना:
- १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
- १९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी.
- १९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
- १९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
- १९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
- १९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
- १९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.
- १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- १९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी
- २००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- २०१०: आजच्या दिवशी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचा समारोप झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
- १८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)
- १८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७०)
- १८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
- १८९८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.
- १९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
- १९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
- १९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते
- १९८०: चित्रपट अभिनेत्री प्राची शाह यांचा जन्म.
- १९९३: प्रसिद्ध टेनिसपटू किदंबी श्रीकांत चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १२७४: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)
- १३३३: निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
- १९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८)
- १९४२: आजच्या दिवशी “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” ची स्थापना करणारे शचींद्रनाथ सान्याल यांचे निधन.
- १९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box