



Konkan Railway: श्री भराडी देवी आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. 01134 / 01133 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष:
गाडी क्र. 01134 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून रविवार दिनांक २३/०२/२०२५ रोजी १८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे 06:25 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01133 लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष लोकमान्य टिळक (टी) येथून सोमवार दिनांक 24/02/2025 रोजी सकाळी 08:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19:00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 एलएचबी कोच : दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, थ्री टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
या गाडीचे आरक्षण 09/02/2025 रोजी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल