सिंधुदुर्ग: माघी वारीला पंढरपूरला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे काल शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. सौ. जयश्री सखाराम राऊळ असे नाव त्या महिलेचे नाव असून त्या सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले- गावठणवाडी येथील रहिवाशी होत्या. त्यांचे वय ६९ वर्षे होते.
रविवारी पहाटे तीन वाजता त्यांचे पार्थिव पंढरपूर येथून वेर्ले गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सैनिक सखाराम राऊळ यांच्या त्या पत्नी तर रिक्षाचालक विजय राऊळ, बँकिंग क्षेत्रातील सिसको कंपनीचे वाहन चालक पपू राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
ऑनलाइन विडिओगेमचे एक टास्क पूर्ण करण्याच्या नादात १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
महाराष्ट्र
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल होणार, पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविलेला प्रस्ता...
महाराष्ट्र
मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा डिसेंबरपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश
कोकण रेल्वे


