आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 18:58:35 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 18:35:16 पर्यंत
- करण-वणिज – 18:58:35 पर्यंत, विष्टि – 31:08:33 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-आयुष्मान – 09:05:41 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:11
- सूर्यास्त- 18:35
- चन्द्र-राशि-कर्क
- चंद्रोदय- 17:36:00
- चंद्रास्त- 30:59:00
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)
महत्त्वाच्या घटना:
- ६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
- १६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
- १७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
- १८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.
- १८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
- १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
- १९११: हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ’एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
- १९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
- १९३३: आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.
- १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
- १९९७: खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
- २०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७५०: आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.
- १८००: हेन्री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)
- १८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२)
- १८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
- १९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
- १९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३)
- १९५६: भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.
- १९५७: प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.
- १९६१: भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.
- १९६७: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६)
- १९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
- १९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
- १९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली. (जन्म: १३ मे १९०५)
- १९८६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
- १९८९: ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.
- १९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
- २००७: भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box