आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 20:25:06 पर्यंत
- नक्षत्र-माघ – 21:08:33 पर्यंत
- करण-बालव – 07:51:39 पर्यंत, कौलव – 20:25:06 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शोभन – 07:31:09 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:08:12
- सूर्यास्त- 18:37:34
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 19:23:59
- चंद्रास्त- 07:37:00
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- सरोजनी नायडू यांची जयंती.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)
महत्त्वाच्या घटना:
- १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.
- १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
- १९३१: आजच्या दिवशी दिल्ली ला भारताची राजधानी घोषित करण्यात आली.
- १९४८: आजच्या दिवशी गांधीजीनी आमरण उपोषणास सुरुवात केली.
- १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
- १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- २००१: पहिले मानव रहित अंतरिक्षयान एरोस नावाच्या लघुग्रहावर उतरले.
- २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
- २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
- १८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८)
- १८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
- १८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६)
- १९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९)
- १९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
- १९१६: भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म.
- १९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
- १९७६: भारतीय चित्रपट अभिनेता शरद कपूर यांचा जन्म.
- १९७८: भारतीय चित्रपट अभिनेता अश्मित पटेल यांचा जन्म.
- १९८७: तमिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन.
- १९९५: धावपटू वरुणसिंग भाटी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८८३: रिचर्ड वॅग्नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३)
- १९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३)
- १९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ? ? ????)
- १९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
- २००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: ? ? १९३१)
- २०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box