



सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये सेवकांची ५९ तर मदतनिसांची ३१३ पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील या रिक्त पदांची भरती २८ मार्च पूर्वी पुर्ण करायची आहे. जिल्ह्यातील महिला उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तालुक्यांच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज करता येणार आहे. यासाठी पात्र महिला उमेदवारानी मुदतीमध्ये अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या शंभर कलमी कार्यक्रमात राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांचे सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही भारतीय प्रक्रिया सुरू होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध असून सात प्रकल्पा अंतर्गत प्रत्येक तालुक्यात रिक्त असलेल्या सेविका व मदतनीस पदांची माहिती. उपलब्ध आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्या कार्यालयात संपर्क साधावा व परिपूर्ण कागदपत्रासह दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत व या भारतीय प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जि प प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
तालुकानिहाय पदे किती?
सावंतवाडी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 50,
कणकवली प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका 10 व मदतनीस 58,
मालवण अंगणवाडी सेविका 15 व मदतनीस 45,
कुडाळ अंगणवाडी सेविका 11 व मदतनीस 76,
वैभववाडी अंगणवाडी सेविका 7 व मदतनीस 14,
देवगड अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 44,
दोडामार्ग अंगणवाडी सेविका 3 व प्रकल्प मदतनीस 25
अशी भरती भरती केली जाणार आहे.