Special Train on Konkan Railway:प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांना जाणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालविणार आहे. ही गाडी उडपी आणि टुंडला जंक्शन दरम्यान चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी एक अशा एकूण दोन फेऱ्या होणार आहेत. उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांनी या गाडीची मागणी केली होती. महाकुंभमेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही दुसरी गाडी ठरणार आहे. या आधी गोवा सरकारने राज्यातील भक्तासाठी गोव्यावरून महाकुंभ विशेष गाडी चालवली आहे.
या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. ०११९२ / ०११९१ उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष
गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:०० वाजता (बुधवार) पोहोचेल.
गाडी क्र. ०११९१ तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.
ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
या गाडीच्या डब्यांची रचना : एकूण 20 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 10 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.
Facebook Comments Box