Konkan Railway: नागपूर -सिकंदराबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २०१०१ /२०१०२ नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या ही गाडी वंदे भारत एक्सप्रेसच्या २० डब्यांचा रेकसहित चालविण्यात येत आहे. मात्र त्याप्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने ही गाडी ८ डब्यांच्या रेकसह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विकास समितीच्या वतीने जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे ई-मेल द्वारे ही मागणी केली आहे. तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ‘एक्स’ माध्यमातून ही मागणी नोंदवली आहे.
मुंबई मडगाव दम्यान सुरु करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. देशातील आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस च्या यादीत या गाडीची गणना होत आहे. या गाडीची आरक्षण स्थिती नेहमीच फुल्ल आणि प्रतीक्षा यादीत असते कारण ही गाडी ८ रेकसह चालविण्यात येते. या मात्र गाडीची या मार्गावरील लोकप्रियता आणि गरज पाहता ही गाडी जास्त डब्यांसह चालविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस १६ किंवा २० रेकसह चालविण्यात यावी अशी मागणी होत आहे.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत २० ऐवजी ८ डब्यांनी चालणार. @Central_Railway ने हा २० डब्यांचा रेक २२२२९/२२२३० मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला वापरावा.@drmmumbaicr @srdomcogbbcr @srdcmmumbaicr @GM_CRly https://t.co/Ev6QjEnotZ
— अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) February 8, 2025
Facebook Comments Box