RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली होती. कोलाड -वेर्णा- सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.
रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे
या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.
या सेवेचे दर खालीलप्रमाणे
Facebook Comments Box